सुर्यापेक्षा तेज, चंद्रापेक्षा शितल, समुद्रापेक्षा विशाल, देवापेक्षा श्रेष्ठ असणारे माझ्या जीवनाचे शिल्पकार ष.ब्र.१०८ वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीच्या चरणी साष्टांग दंडवत, युगप्रवर्तक आप्पांच्या आध्यात्मातून सुसंस्काराचे बिजारोपण करणारे दशा झालेल्या जीवाला दिशा दाखवणारे सामाजिक, नैतिक आध्यात्मिक सर्वसंस्काराचे धडे देवून माझ्या मासपिंडाचे मंत्रपिंड कडून माझ्यासारख्या पामराला एका उच्च स्थळाला नेणारे माझे आप्पा आहेत. आणि उपनिषेद वाक्याप्रमाणे, चरैवती, चरैवती, असून स्वइच्छा सुख निवासी होते आहेत आणि ते माझ`संस्कमरणीय आहेत. आप्पांच जीवन कार्य जीवमात्राच्या हित व कल्याणासाठीच होते. आप्पांनी कीर्तन परंपरेमध्ये आम्हा सर्वांना सोबत घेऊन कीर्तन हे उद्धाराचे कार्य आहे म्हणून कीर्तन सर्वांना सामावून घेऊन जीवनाचा सुखरुप राज्यमार्ग आप्पांनी दाखवलेला आहे. म्हणून मी माझे आप्पा म्हणून मी माझ्या आप्पांच्या कायमस्वरुपी ऋणात व सेवेत आहे. पुन्हा पुन्हा आप्पांच्या चरणी साष्टांग दंडवत....
आप्पांचा सहवास माऊलीचा सहवास अपूर्णाला पूर्ण करणा-या शब्दांनी ज्ञान वाढविणा-या जगण्यातून जीवन घडविणा-या तत्तवातून मुल्य फुलविणा-या ज्ञानरुपी गुरुंना (अप्पांना) वंदन.... युगप्रवर्तक अप्पांच्या आध्यात्मातून सुसंस्काराचे बीजोरापण करणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्व. नामाने जीवन तरणारी संकल्पना मांडणारे दशा झालेल्या जीवनाला दिशा देणारे शिवभक्तीची वेड लावणारे सामाजिक, नैतिक जीवन मार्ग दावणारे वीरशैव धर्मावर मनन-चिंतन जप-तप अनुष्ठान करुन संस्काराचे विद्यापीठ म्हणजे आप्पा. सबंध मानव जातीसाठी जीवन खर्ची घालणारे आप्पा आमची माऊली ठरले. चार पुरुषार्थापैकी धर्म हे पुरुषार्थ मिळविण्यासाठी सतत स्मरण करुन उद्दिष्ट साधून नवचैतन्य मनामनात बिंबविले, संतचरण रज भेटले, भगवा व त्याचं पावित्र्य वीरशैव संस्कृतीतून अभ्यासपूर्ण व्याख्या समाजाला करुन दिली. एकशे चार वर्षे केवळ मानव जातीसाठी प्रेरक ठरले. माझ्या सारख्या सामान्य पामराला पूजा व दिक्षेच्या आध्यात्मातून प्रेरणा मिळाली. जीवनात पंधरा वर्षे पदयात्रा पाच वर्षे सतत सुर्योदया अगोदर स्थावरलिंगपूजा अभिषेक व मंदिरातील पूजेचा आनंद घेता आला. पूजेतून भक्तीतून नवा जीवनमार्ग कळाला व अनुभव आला. प्रपंचात वाद आहे आणि परमार्थात संवाद आहे. शब्दात सांगता येत नाही अनुभव घ्यावा लागतो. संताचा सहवास म्हणजे मुक्तीमार्ग आहे. गुरुदेवाचा ही देव कळे येता अनुभव जीवन हे सेवा आणि समर्पण भावाने जगता येतो. आप्पांच्या सहवासातील मार्गदर्शनातील सुख हे आकाशाएवढ्या सुखाला शाईच्या शब्दात गुंफण कठीण. गुरुचरणी (आप्पांच्या) चरणी शब्दपुष्प अर्पण ॐ श्री शिवलिंगाय सद्गुरु गुरवे नमः... जय गुरुदेवा.
ज्ञान व अज्ञान, बंध आणि मोक्ष, प्रमेय, परमाता, प्रकाश आणि काळोख, विधी व निषेध, संग व निस्संग, सापेक्ष निरपेक्ष द्वैत व अद्वैताच्या पलीकडे. चित्तसुर्य चिन्महोद्धी राष्ट्रसंत सद्गुरु डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज राजूरकर म्हणजे ज्ञानाचाआगर, प्रमाणाचा विषय नाही सद्गुरु माऊली वर अवलंबून आहे. ज्यांचे ज्ञान करुन घेणे-देणे प्रमानाने निसर्गतः अशक्य असे आप्पा तुम्हा-आम्हा सर्वांचे हित चिंतक होते. राष्ट्रसंत माऊली नावाप्रमाणे शिवलिंग स्वरुप होते. आकाशाप्रमाणे असंग व निर्लेप होते. त्यामुळे सर्व संग प रित्यागी होते. जसे समुद्राचे पोट सदैव भरलेले असते. म्हणून ते काही नद्याचे पाणी नको म्हणत नाही किंवा बाहेर फेकत नाही किंवा सर्व पाणी पिऊन पोटाची मर्यादा वाढवत नाही. त्याप्रमाणे गुरुमाऊली होते. नद्या समुद्राचे पाणी घेऊनच जन्माला येतात त्याप्रमाणे विश्वच ज्याचेपासून जन्माला आले ते राष्ट्रसंत स्वतःचे व सर्व विश्वाच्या कल्याणार्थ स्वतः शिष्य होतात व सर्वांवर स्नेहाचा वर्षाव करुन मानवी जीवाचा विकास करणारे सद्गुरु घ । राष्ट्रसंत आम्हा सर्वांना अंतर्बाह्य सर्व व्यापून टाकले त्यांना वंदन करणे त्यांच्या चारणपासी एकनिष्ठ राहून शुद्ध आत्मकल्याण करुन पदरुप - होणे. वंध्य वंदन वंदीता ही तिन्ही रुपे गुरु स्वतः होते. राष्ट्रसंताचे आमच्या सारख्या पामराने काय व्रणन करावे. सहस्त्र मुखाचा वर्णीता शिनला असे होते. माझ्या वयाचे १५ वे वर्षी माऊलीच्या दर्शनाचा लाभ शिरुर अनंतपाळ गुरुमठात झाला ते बस्वपुराण सांगणेसाठी आले. सन १९५४ ला पहिले दर्शन त्याकाळापासून माऊलीचा सहवास लाभला. १९५६ बंदई शि.अ. येथे श्रावणमास तपोऽनुष्ठान झाले तेंव्हा पासून माऊलीचा छंद लागला आजतागायत त्यांनी मला प्रेमाने भक्ती ओढले म्हणून माझ्या जीवाचे शिल्पकार आहेत.
------------------------------------------------------
------------------------------------------------------
------------------------------------------------------